जिल्हा माहिती कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, खोली क्र.25, जयस्तंभ चौक, गोंदिया- 441601


Wednesday 21 October 2020

कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण बघण्यासाठी सर्वेतून घेणार 2400 जणांचे रक्त नमुने

        गोंदिया दि.21(जिमाका) जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण बघण्यासाठी शरीरामध्ये प्रतिकारशक्ती  विकसित झालेली आहे किंवा नाही याबाबतचे परीक्षण करण्यासाठी जिल्ह्यात रक्त नमुने घेण्यात येणार आहे.

       कोविड -19 अर्थात कोरोनाचे रुग्ण हे लक्षणे विरहीत सुद्धा असतात. त्यामुळे सामान्य व्यक्तीमधून कळत नकळत ज्यांना कोरोना झालेला असेल त्यांची माहिती करण्याकरिता हा सर्वे करण्यात येणार आहे.

       जिल्ह्यातील 2400 लोकांची या सर्वेमधून तपासणी करण्यात येईल. त्यापैकी 1400 रक्त नमुने हे सामान्य व्यक्तीचे, 400 नमुने हे अतिजोखमीची व्यक्तींचे आणि 600 नमुने हे कंटेटमेंट झोनमधील व्यक्तींचे घेण्यात येतील.

       सामान्य व्यक्तीमधून घेतले जाणारे 1400 व्यक्तींचे रक्त नमुने घेतले जाणार आहे.यमध्ये  300 व्यक्ती ह्या  शहरी भागापैकी असतील.200 व्यक्ती हे गोंदिया शहरातील आणि 100 व्यक्ती ह्या तिरोडा शहरातील असतील.तर उर्वरित 1100 रक्त नमुने हे ग्रामीण भागातील प्रत्येक तालुक्यातील एका गावांमधून घेतले जाणार आहेत जिथे कोरोना विषाणूचा उद्रेक मोठ्या प्रमाणात दिसून आलेला आहे.अशाप्रकारे कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण हे सर्वेतून घेतल्या जाणाऱ्या रक्त नमुन्यातून बघण्यात येईल.तरी सर्व नागरिकांनी या सर्वेमध्ये सहभाग दयावा.असे आवाहन  जिल्हा शल्यचिकित्सक,गोंदिया यांनी केले आहे.

00000

आणखी 149 बाधितांची भर. 65 रुग्ण औषधोपचारातून बरे. एकाचा उपचारादरम्यान मृत्यू. फक्त 15 अहवाल प्रलंबित. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.22

      गोंदिया,दि.21 (जिमाका) कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात हळूहळू वाढतांना दिसत आहे.नव्याने आणखी 149 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 21 ऑक्टोबर रोजी प्राप्त झाला.अर्जुनी/मोरगाव येथील 86 वर्षीय बाधित रुग्णाचा आज  उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मृत्यू झाला.तर 65 रुग्ण कोरोनाच्या आजारातून बरे झाल्याने आज त्यांना सुट्टी देण्यात आली.

         जिल्ह्यात नव्याने आणखी 149 कोरोना बाधित रूग्णांची भर पडली. तालुकानिहाय बाधित रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -84, तिरोडा तालुका -01, गोरेगाव तालुका -06,आमगाव तालुका-10, सालेकसा तालुका-05, देवरी तालुका- 13, सडक/अर्जुनी तालुका -08, अर्जुनी/मोरगाव-21 आणि बाहेर जिल्हा व बाहेर राज्यातील एक रुग्ण आज आढळून आला आहे.

        जे बाधित रुग्ण आजपर्यंत आढळून आले आहे ते तालुकानिहाय पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका -5159, तिरोडा तालुका -1122, गोरेगाव तालका- 371 ,आमगाव तालुका -625,सालेकसा तालुका -373, देवरी तालुका-411, सडक/अर्जुनी तालुका-374,अर्जुनी/मोरगाव तालुका-433 आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले- 100 रुग्ण आहे.असे एकूण 8968 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे.

        जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 65 रूग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर विजय मिळविला आहे.तालुकानिहाय ती संख्या पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका -22, तिरोडा तालुका-00, गोरेगाव तालुका-01, आमगाव तालुका -07, सालेकसा तालुका-03, देवरी तालुका -04, सडक/अर्जुनी तालुका - 17 आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-11 असा आहे.

        औषधोपचारातून कोरोनावर 7766 रूग्णांनी मात केली.ती रुग्ण संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका -4506, तिरोडा तालुका- 1011,गोरेगाव तालुका -325, आमगाव तालुका -533,सालेकसा तालुका- 359, देवरी तालुका- 321,सडक/अर्जुनी तालुका-316,

अर्जुनी/मोरगाव तालुका-315 आणि इतर-80 रुग्णांचा समावेश आहे.

        क्रियाशील रुग्ण संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका -587,तिरोडा तालुका-95,गोरेगाव तालुका- 42,आमगाव तालुका -86,सालेकसा तालुका -12, देवरी तालुका-88, सडक/अर्जुनी तालुका- 55,अर्जुनी/मोरगाव तालुका-114 आणि बाहेर जिल्हा व बाहेर राज्यातील 10 असे एकूण 1089 रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत. 

        क्रियाशील असलेले 389 रुग्ण घरीच अलगीकरणात आहे.ते तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका-213, तिरोडा तालुका-13, गोरेगाव तालुका -02,आमगाव तालुका-21, सालेकसा तालुका-12,देवरी तालुका -63,सडक/अर्जुनी तालुका-10, अर्जुनी/मोरगाव तालुका-55 रुग्ण आहेत.

        जिल्ह्यातील बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 86.22 टक्के आहे.बाधीत रुग्णांचा मृत्यु दर हा 1.21 टक्के आहे.तर डब्लिंग रेट हा 97.3 इतका आहे.

        आतापर्यंत 113 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-66, तिरोडा तालुका-16, गोरेगाव तालुका-4, आमगाव तालुका -6, सालेकसा तालुका-2,देवरी तालुका-2, सडक/अर्जुनी तालुका-3, अर्जुनी/मोरगाव तालुका -4 व बाहेर जिल्हा व राज्यातील दहा रुग्णांचा समावेश आहे.  

         विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण 36020 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 27366 नमुने निगेटिव्ह आले. तर 5646 नमुने पॉझिटिव्ह आले आहे.केवळ 15 नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित आहे.

       गृह विलगिकरणात 134 आणि संस्थात्मक विलगीकरणात 2 व्यक्ती आहे. रॅपिड अँटीजेन चाचणीतून आतापर्यंत 31950 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 28695 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. 3255 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. 

      जिल्ह्यात 16 चमू आणि 14 सुपरवायझर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कार्यरत आहे .यांची नियुक्ती जिल्ह्यातील एकूण 14 कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. यामध्ये गोंदिया तालुका-01,आमगाव तालुका -00 सालेकसा तालुका-00, देवरी तालुका -03, सडक/अर्जुनी तालुका -01, गोरेगाव तालुका-00, तिरोडा तालुका -09 आणि अर्जुनी/मोरगाव तालुका -00 असे कंटेंटमेंट झोन आहे.

         बाधित रुग्णांना कोरोना वॉर रूममधून 24 तास सेवा उपलब्ध राहणार आहे.त्या रूग्णांना काही समस्या असल्यास त्यांनी 8308816666 आणि 8308826666 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

          बाधित रुग्ण बरे झाल्यानंतर किंवा गृह विलगीकरणात गेल्यानंतर या रूग्णांमध्ये नकारात्मक विचार येतात.त्यांचे विचार सकारात्मक करण्यासाठी समुपदेशन करण्यात येत आहे.समुपदेशनासाठी भ्रमणध्वनी क्रमांक.9823254520, 9765090777,9326811266,

8788297527 आणि 9823238057 यावर रूग्णांनी संपर्क साधावा.

         माझे कुटुंब -माझी जबाबदारी या कार्यक्रमांतर्गत 14 लाख 11 हजार 425 लोकसंख्येची आरोग्य तपासणीची पहिली फेरी पूर्ण झाली. दुसरी फेरी 16 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून त्यामध्ये 5 लाख 96 हजार 233 नागरिकांची म्हणजेच 42.41 टक्के लोकांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे. या मोहिमेत 223 आजारी रुग्णांच्या घशाचे नमुने तपासण्यात असता 9 रुग्ण बाधित आढळले आहे. या मोहिमेअंतर्गत येणाऱ्या आरोग्य चमुस योग्य माहिती देऊन सहकार्य करावे.

         रूग्णांच्या सुविधेसाठी सर्व रूग्णांना त्यांनी दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल एसएमएस द्वारे पाठविण्यात येतो.रूग्णांनी हाच अहवाल ग्राह्य धरावा.असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक ,गोंदिया यांनी केले आहे.   

00000

Wednesday 7 October 2020

बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती आणि संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करून जास्तीत जास्त बाधितांचा शोध घ्यावा -विधानसभा अध्यक्ष नाना पटोले


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

गोंदिया दि.07(जिमाका) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या जास्तीत जास्त व्यक्तींचा शोध घेऊन आणि ज्यांना सर्दी-खोकला-ताप आहे अशा संशयित रुग्णांची चाचणी करून जास्तीत जास्त कोरोना बाधितांचा शोध घ्यावा.असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

6 ऑगस्ट रोजी श्री पटोले गोंदिया दौऱ्यावर आले असता त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडून कोरोना बाधित रुग्णांवर करण्यात येत असलेल्या उपचाराची तसेच उपलब्ध असलेल्या साधन साधनसामुग्रीची माहिती जाणून घेतली.यावेळी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीणा,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ नरेश तिरपुडे,जिल्हा शल्य चिकित्सक भूषणकुमार रामटेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे व निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

श्री पटोले म्हणाले,कोरोनाचा काळ संपल्यानंतर मुंबई येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाबाबत बैठक घेण्यात येईल. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती असलेल्या रुग्णांची,त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होणार नाही व जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण वाढणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे.जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू दर कमी झाला पाहिजे असे ते म्हणाले.

जिल्ह्यात डॉक्टर्स आणि नर्सेसची जी रिक्त पदे आहेत ही पदे भरण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचे सांगून श्री पटोले म्हणाले, ही पदे त्वरित भरल्यास रुग्णांना वेळीच चांगले उपचार मिळण्यास मदत होईल. आरोग्य विभागाकडे अद्ययावत यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे रुग्णांच्या आरोग्यविषयक तपासणी करण्यात या यंत्रसामुग्रीचा चांगला उपयोग होणार आहे. रुग्णाला कोणता आजार झाला आहे त्यावर कोणते औषधोपचार करायचे यासाठी डॉक्टरांना मदत होणार आहे. ही यंत्रसामग्री हाताळण्यासाठी चांगले तांत्रिक तज्ञाची नियुक्ती करावी. ज्या यंत्रसामग्रीची रुग्णांच्या उपचारासाठी व निदानासाठी आवश्यकता आहे त्याची खरेदी करावी.काही अडचणी येत असल्यास याबाबत अवगत करून द्यावे म्हणजे ही साहित्य सामुग्री खरेदी करता येईल.असेही पटोले यावेळी म्हणाले.

 रुग्णालयातील सर्व अधिकारी, डॉक्टर्स व नर्सेस यांनी नियमितपणे उपस्थित राहून रुग्णांना चांगली सेवा द्यावी असे सांगून श्री पटोले म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी योग्य समन्वय ठेवून कामे करावी. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती यावेळी श्री पटोले यांनी घेतली.

जिल्ह्यात कोरोनावर मात करण्यासाठी तसेच बाधित रुग्णांवर करण्यात येत असलेल्या उपचाराची माहिती अधिष्ठाता,जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी यावेळी दिली.


 

Tuesday 6 October 2020

भविष्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता नियोजन करा - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

 



गोंदिया येथे कोरोना परिस्थितीचा आढावा

 

गोंदिया दि ६(जिमाका)कोरोना या जागतिक महामारीमुळे संपूर्ण जग आज त्रस्त झाले आहे.प्रत्येकाने वेळीच सावध होऊन कोरोनाच्या  संसर्गापासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.१५ ऑक्टोबरनंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने विविध यंत्रणांना सोबत घेऊन आतापासूनच नियोजन करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

  आज ६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील कोरोना बाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतांना श्री पटोले बोलत होते. यावेळी आमदार विनोद अग्रवाल,आमदार सहसराम कोरोटे, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे,पोलीस अधीक्षक विश्व पानसरे,अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांची प्रमुख उपस्थिती होती.

  श्री पटोले पुढे म्हणाले,आरोग्य यंत्रणेने बाधित रुग्णांवर वेळीच उपचार करावे. सोबतच मृत्यूदर कमी करण्यासाठी काम करावे. जिल्ह्यातील बाधित रुग्ण उपचारातून बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. जिल्ह्यात कोरोना आजाराशी लढा देण्यासाठी प्रशासनाने नवीन अधिकारी नेमून दिले आहे. संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी ऊर्जेने काम करावे.त्याचप्रमाणे संसाधनांची उपलब्धता करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

  जिल्ह्यातील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे कार्ड असलेल्या व्यक्तींना मोफत उपचार मिळत असल्याची माहिती लोकांपर्यंत आरोग्य विभागाने पोहोचवावी असे सांगून श्री पटोले पुढे म्हणाले,खाजगी रुग्णालयांकडून आवश्यक तेवढ्याच बिलाची आकारणी व रुग्णांची समस्या सोडविण्यासाठी आणि खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांची या काळात लूट होणार नाही याकडे प्रशासनाने विशेष लक्ष दयावे. खाजगी रुग्णालयांचे सनियंत्रण करावे. नागरिकांची किंवा रुग्णाची तक्रार येणार नाही. रुग्णालयाच्या आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. तसेच बाहेर डिस्प्ले बोर्ड लावावेत.त्यामुळे नागरिकांना माहिती मिळण्यास मदत होईल.२४ तास सुरू असलेल्या नियंत्रण कक्षात तक्रार करणाऱ्या नागरिकांना संपूर्ण माहिती दिली जावी असेही श्री पटोले यावेळी म्हणाले.

 जिल्ह्यातील धान खरेदी प्रकरणी चौकशी समिती पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात यावी. या समितीमध्ये अपर जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे सदस्य असतील. अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात यावे. जिल्ह्यात प्रलंबित असलेले वनहक्क पट्टे योग्य ती कार्यवाही त्वरित करून संबधितांना वितरित करण्यात यावे.असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

  आमदार अग्रवाल म्हणाले,मागील पंधरा दिवसात आरोग्य यंत्रणेच्या  कामात सुधारणा झाली आहे. परंतु अजूनही कामात सुधारण्याची आवश्यकता आहे. कोरोना बाधित गर्भवती महिलांची प्रसूती पूर्वी इथे होत नव्हती आता प्रसूती इथे करण्यात येत आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदे त्वरित भरल्यास आरोग्य यंत्रणेवर ताण कमी होण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.

  आमदार कोरोटे म्हणाले,आपल्या स्थानिक विकास निधीतून आरोग्य यंत्रणा सुदृढ करण्यासाठी १० लक्ष रुपये निधी देण्यात आला आहे. यातून खरेदी केलेली सामग्री देवरी मतदारसंघात कोणत्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे त्याची माहिती मिळाल्यास रुग्णांना तेथे उपचार घेण्याकरीता जाण्याबाबत कळविण्यात येईल. असे ते म्हणाले.

 जिल्हाधिकारी  श्री.मीना यांनी जिल्ह्यातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीची माहिती संगणकीय  सादरीकरणातून विधानसभा अध्यक्षांना दिली.२४ तासात सकारात्मक रुग्णांचा तपासणी अहवाल मिळत असून राष्ट्रीय पोर्टलवर देखील अद्यावत माहिती देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

  अपर जिल्हाधिकारी खवले यांनी जिल्ह्यात ३ ऑक्टोबर रोजी माझे कुटुंब- माझी जबाबदारी -माझी जनजागृती या मोहिमेतून करण्यात आलेल्या जनजागृतीबाबतची माहिती दिली.जिल्ह्यातील ७४ टक्के कुटुंबापर्यंत एका दिवशी पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.

  सभेला निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी राहुल खांडेभराड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ नरेश तिरपुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके,अमरिश मोहबे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शाम निमगडे,जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे,जिल्हा उपनिबंधक शुद्धोधन कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांची यावेळी उपस्थिती होती.

00000


कोविड रुग्णांसाठी 1757 खाटांची सुविधा

389 रुग्ण घेत आहे उपचार

1368 खाटांची उपलब्धता

गोंदिया दि 6 (जिमाका)  कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करता यावे यासाठी जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये बाधित रूग्णांच्या उपचारासाठी एकूण 1757  खाटांची क्षमता असून त्यापैकी 389 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहे.तर 1368 खाटा उपलब्ध आहे.

 जिल्ह्यातील 15 शासकीय रुग्णालये आणि 5 खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 1757 खाटांची क्षमता आहे.आज जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयात 389 रुग्ण भरती आहे. 1368 खाटा ह्या कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी उपलब्ध आहे.

कोविड रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया (डी.सी.एच)- खाटांची क्षमता -100,भरती रुग्ण- 52,उपलब्ध खाटा-48.कोविड रुग्णालय (डीसीएचसी) एम.एस.आयु - खाटांची क्षमता-140,भरती रुग्ण-32 उपलब्ध खाटा- 108 कोविड रुग्णालय (डीसीएचसी) केटीएस रुग्णालय- खाटांची क्षमता- 150, भरती रुग्ण- 20, उपलब्ध खाटा-130. कोविड रुग्णालय तिरोडा ( डीसीएचसी) -खाटांची क्षमता 20 भरती रुग्ण- 08,उपलब्ध खाटा-12 कोविड सेंटर स्पोर्ट कॉम्प्लेक्स मरारटोली- खाटांची क्षमता-106 भरती रुग्ण- 14,उपलब्ध खाटा - 92.कोविड सेंटर पॉलीटेक्निक कॉलेज गोंदिया- खाटांची क्षमता 280, भरती रुग्ण-51, उपलब्ध खाटा-229,कोविड सेंटर तिरोडा (सरांडी) खाटांची क्षमता- 120, भरती रुग्ण- 34 उपलब्ध खाटा- 86,कोविड सेंटर आमगाव- खाटांची क्षमता-52, भरती रुग्ण-01,उपलब्ध खाटा-51.कोविड सेंटर सडक/अर्जुनी -खाटांची क्षमता-80 भरती रुग्ण- 15,उपलब्ध खाटा-65 .कोविड सेंटर गोरेगाव- खाटांची क्षमता-90, भरती रुग्ण-07,उपलब्ध खाटा-83.कोविड सेंटर देवरी- खाटांची क्षमता- 80, भरती रुग्ण- 02,उपलब्ध खाटा-78, कोविड सेंटर चिंचगड- खाटांची क्षमता-100,भरती रुग्ण-00,उपलब्ध खाटा-100,कोविड सेंटर सालेकसा- खाटांची क्षमता-80,भरती रुग्ण- 08,उपलब्ध खाटा-72. कोविड सेंटर अर्जुनी/मोरगाव - खाटांची क्षमता- 80,भरती रुग्ण-07,उपलब्ध खाटा- 72,कोविड सेंटर नवेगावबांध- खाटांची क्षमता- 60, भरती रुग्ण-03, उपलब्ध काटा 57

खाजगी रुग्णालयापैकी सेंट्रल हॉस्पिटल गोंदिया- खाटांची क्षमता-74, भरती रुग्ण- 52, उपलब्ध खाटा 22, सहयोग हॉस्पिटल गोंदिया- खाटांची क्षमता- 66 भरती रूग्ण- 26, उपलब्ध खाटा-40.श्री.राधे कृष्णा हॉस्पिटल गोंदिया- खाटांची क्षमता- 40, भरती रुग्ण- 22,उपलब्ध खाटा-18, बाहेकार हॉस्पिटल गोंदिया- खाटांची क्षमता- 30, भरती रुग्ण -27,उपलब्ध खाटा-03. के. एम.जे हॉस्पिटल गोंदिया- खाटांची क्षमता-9 भरती रुग्ण-7, उपलब्ध खाटा- 2 आहे.

जिल्ह्यातील खासगी आणि शासकीय रुग्णालयातील बाधित रुग्णांसाठी खाटांची एकूण क्षमता 1757 आहे. यामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये 1538 आणि खाजगी रुग्णालयामध्ये 219 खाटांची क्षमता आहे.

आज 6 ऑक्टोबरपर्यंत दोन्ही प्रकारच्या रुग्णालयामध्ये 389 बाधित रुग्ण भरती असून उपचार घेत आहे. जिल्ह्यातील दोन्ही प्रकारच्या रुग्णालयामध्ये 1368 खाटा बाधित रुग्णांसाठी उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी दिली.

Sunday 4 October 2020

जिल्ह्यात कोविड रुग्णांसाठी १७६६ खाटांची सुविधा ४९४ रुग्ण भरती तर १२७२ खाटा उपलब्ध

 

जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णावर उपचार करता यावे यासाठी शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये बाधित रुग्णांसाठी खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.

जिल्ह्यातील १५ शासकीय रुग्णालय आणि ६ खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १७६६ खाटांची क्षमता आहे.आज ४९४ रुग्ण भरती असून १२७२ खाटा ह्या कोरोना बाधित रुग्णांसाठी उपलब्ध आहे.

कोविड रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया (डी.सी.एच)- खाटांची क्षमता -१००,भरती रुग्ण- ३५,उपलब्ध खाटा-६५.कोविड रुग्णालय (डीसीएचसी) एम.एस.आयु - खाटांची क्षमता-१४०,भरती रुग्ण-४०, उपलब्ध खाटा- १००, कोविड रुग्णालय (डीसीएचसी) केटीएस रुग्णालय- खाटांची क्षमता- १५०, भरती रुग्ण- ३१, उपलब्ध खाटा-११९. कोविड रुग्णालय तिरोडा ( डीसीएचसी) -खाटांची क्षमता २०, भरती रुग्ण- १०,उपलब्ध खाटा-१०. कोविड सेंटर स्पोर्ट कॉम्प्लेक्स मरारटोली- खाटांची क्षमता-१०६, भरती रुग्ण- २० उपलब्ध खाटा - ८६.कोविड सेंटर पॉलीटेक्निक कॉलेज गोंदिया- खाटांची क्षमता २८०, भरती रुग्ण-५५, उपलब्ध खाटा-२२५,कोविड सेंटर तिरोडा (सरांडी) खाटांची क्षमता- १२०, भरती रुग्ण- ४७, उपलब्ध खाटा- ७३,कोविड सेंटर आमगाव- खाटांची क्षमता-५२, भरती रुग्ण-४,उपलब्ध खाटा-४८.कोविड सेंटर सडक/अर्जुनी -खाटांची क्षमता-८०, भरती रुग्ण- १३ उपलब्ध खाटा-६७ .कोविड सेंटर गोरेगाव- खाटांची क्षमता-९०, भरती रुग्ण-१४, उपलब्ध खाटा ७६.कोविड सेंटर देवरी- खाटांची क्षमता- ८०, भरती रुग्ण- ६,उपलब्ध खाटा-७४ कोविड सेंटर चिंचगड- खाटांची क्षमता-१००,भरती रुग्ण -निरंक,उपलब्ध खाटा-१००. कोविड सेंटर सालेकसा- खाटांची क्षमता-८०, भरती रुग्ण- ४६,उपलब्ध खाटा-३४. कोविड सेंटर अर्जुनी/मोरगाव - खाटांची क्षमता- ८०, भरती रुग्ण-१० उपलब्ध खाटा- ७०,कोविड सेंटर नवेगावबांध- खाटांची क्षमता- ६०, भरती रुग्ण- ३, उपलब्ध खाटा ५७.

खाजगी रुग्णालयापैकी सेंट्रल हॉस्पिटल गोंदिया- खाटांची क्षमता-७४, भरती रुग्ण- ६५, उपलब्ध खाटा ९,सहयोग हॉस्पिटल गोंदिया- खाटांची क्षमता- ६६ भरती रूग्ण- ३३, उपलब्ध खाटा-३३.श्री.राधे कृष्णा हॉस्पिटल गोंदिया- खाटांची क्षमता- ४०, भरती रुग्ण- २४,उपलब्ध खाटा-१६, बाहेकार हॉस्पिटल गोंदिया- खाटांची क्षमता- ३०, भरती रुग्ण -३०,उपलब्ध खाटा-निरंक.

के.एम.जे हॉस्पिटल गोंदिया- खाटांची क्षमता-९, भरती रुग्ण-७, उपलब्ध खाटा- २.मीरावंत हॉस्पिटल गोंदिया- खाटांची क्षमता-९,भरती रुग्ण- १, उपलब्ध खाटा-८ आहे.

जिल्ह्यातील खासगी आणि शासकीय रुग्णालयाची खाटांची एकूण क्षमता १७६६ असून आज रोजीपर्यंत ४९४ बाधित रुग्ण भरती असून १२७२ खाटा बाधित रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी दिली

Saturday 3 October 2020

माझे कुटुंब-माझी जबाबदारी-माझी जनजागृती नाविन्यपूर्ण उपक्रमातून 2 लाख २८ हजार कुटुंबांना गृहभेटीतून मिळाली माहिती

१० लाख ४७ हजार ७४२ नागरिकांना माहिती मिळण्यास मदत

१९ हजार ५३६ अधिकारी-कर्मचारी व स्वयंसेवकांचा सहभाग






 जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडून कोरोनाला जिल्ह्यातुन हद्दपार करण्यासाठी आज  ३ ऑक्टोबर रोजी माझे कुटुंब-माझी जबाबदारी-माझी जनजागृती या मोहिमेअंतर्गत १९ हजार ५३६ अधिकारी-कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी जिल्ह्यातील २ लाख २८ हजार ४ कुटूंबांच्या गृहभेटी घेऊन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तसेच या विषाणूंमुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी तसेच आपण कुठली काळजी घ्यावी याविषयीची माहिती दिली. त्यामुळे या कुटुंबाच्या माध्यमातून १० लाख ४७ हजार ७४२ नागरिकांपर्यंत माहिती पोहोचण्यास मदत झाली आहे. या मोहिमेत जिल्ह्यात कोरोनाचा आलेख कमी होण्यास निश्चितच मदत होणार असून लवकरच कोरोना जिल्ह्यातून हद्दपार होण्यास हातभार लागेल.

      राज्य शासनाने या आजाराविषयी  शिक्षण देणारी माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम राज्यात सुरू केली. याच मोहिमेचा एक भाग म्हणून आज ३ ऑक्टोबर रोजी  जिल्हा प्रशासनाने लोकांच्या सहभागातून या मोहिमेत एक पाऊल पुढे टाकून जिल्हाधिकारी मीना यांच्या संकल्पनेतून आणि त्यांनी केलेल्या सूक्ष्म नियोजनामुळे "माझे कुटुंब-माझे जबाबदारी-माझी जनजागृती" या नाविन्यपूर्ण उपक्रमाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले. १० हजार अधिकारी-कर्मचारी व स्वयंसेवकांचा या मोहिमेत सहभाग अपेक्षित असतांना प्रत्यक्षात मात्र १९ हजार ५३६ जणांनी यामध्ये सहभाग घेतला. १ लाख कुटुंबाला गृहभेटीचे नियोजन असतांना प्रत्यक्ष २ लाख २८ हजार ४ कुटुंबाला गृहभेटी देण्यात आल्या. यामधून जिल्ह्यातील १० लाख ४७ हजार ७४२ नागरिकांपर्यंत या मोहिमेच्या माध्यमातून कोरोना विषयक जनजागृती करण्यास मदत झाली.

       गोंदिया तालुक्यात ३४२७ अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवकांनी ४३ हजार ७९२ कुटुंबांना भेटी दिल्या. या भेटीतून २ लाख ८ हजार ९५६ नागरिकांना, तिरोडा तालुक्यातील २६१४ अधिकारी-कर्मचारी व स्वयंसेवक यांनी ३६ हजार २९७  कुटुंबांना भेटी दिल्या. यामधून १ लाख ४५ हजार १८८ नागरिक,गोरेगाव तालुक्यात १८५७ अधिकारी-कर्मचारी व स्वयंसेवकाने १९२८९ कुटुंबाना भेटी दिल्याने ८२ हजार २३२ नागरिक, आमगाव तालुक्यात २१४८ अधिकारी कर्मचारी व स्वयंसेवकांनी २७ हजार २८ कुटुंबांना भेटी दिल्या यातून एक लाख २२ हजार ४६५ नागरिक, सालेकसा तालुक्यातील १३८३ अधिकारी कर्मचारी व स्वयंसेवकांनी १५ हजार ३९४ कुटुंबांना भेटी दिल्या यामधून ७४ हजार २०८ नागरिक, देवरी तालुक्यात १७९८ अधिकारी कर्मचारी व स्वयंसेवकांनी १९ हजार २९१ कुटुंबांना भेटी दिल्या यामधून १ लाख १८ हजार ४५० नागरिक, सडक-अर्जुनी तालुक्यात १७३० अधिकारी-कर्मचारी व स्वयंसेवक यांनी १८ हजार ९८१ कुटुंबांना भेटी दिल्या यामधून ७५ हजार ९२४ नागरिक आणि अर्जुनी/ मोरगाव तालुक्यात २५७९ अधिकारी-कर्मचारी व स्वयंसेवक यांनी २७ हजार ९३२ कुटुंबांना भेटी दिल्या यामधून १ लाख २० हजार ३१९ नागरिकांना माहिती मिळण्यास मदत झाली आहे.

अधिकारी-कर्मचारी व स्वयंसेवकांनी किमान दहा कुटुंबांना भेट घेऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेबाबत माहिती दिली. कुटुंबातील व्यक्तीला कोरोना विषाणूची बाधा होऊ नये यासाठी प्रत्येकाने शरीराचे तापमान व ऑक्सीजन पातळी मोजावी. सातत्याने तोंडाला मास्क घालून राहावे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडून नये. दर दोन-तीन तासांनी सतत हात साबणाने व पाण्याने स्वच्छ धुवावे. तसे करणे शक्य नसल्यास सॅनीटायझरचा वापर करावा. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नये. ताप आल्यास तसेच सर्दी, खोकला, घसा दुखणे, थकवा अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींनी जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी. मधुमेह, हृदयविकार, किडनी आजार, लठ्ठपणा असल्यास दररोज तापमान व ऑक्सिजनची पातळी मोजावी. तापमान ९८.६ पेक्षा जास्त असल्यास जवळच्या फीवर क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी करावी. सध्या सुरू असलेले आजारपणातील उपचार सुरू ठेवावेत. खंड पडू देऊ नये. डॉक्टरांकडून नियमित तपासणी करावी. कोरोना बाधित असलेल्या व्यक्तींनी होम आयसोलेशनमध्ये राहावे. घराबाहेर पडू नये. स्वतंत्र टॉयलेट, बाथरूम व जेवणाची भांडी वापरावी. कपडे स्वतंत्र धुवावे. ताप व थकवा जाणवल्यास रुग्णालयात जाऊन तपासणी करावी. 

       कोविड होऊन गेलेल्या व्यक्तीने रुग्णालयातून येऊन पुन्हा सात दिवस घरी होम आयसोलेशनमध्ये राहावे. कोविड-१९ चा आजार होऊन गेला म्हणून वैयक्तिक प्रतिबंधाच्या बाबीकडे दुर्लक्ष करू नये. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, किडनी आजार इत्यादी आजार असल्यास या आजारावर वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधोपचार सुरू आहे याची खात्री करावी. कोविड-१९ मधून बरे झालेल्या व्यक्तीस प्लाजमा दान करावयाचा असल्यास एसबीटीसी या संकेतस्थळाची माहिती आदी माहिती गृहभेटी देणाऱ्या अधिकारी-कर्मचारी व स्वयंसेवकांनी गृह भेटीदरम्यान कुटुंबांना दिली.

       ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हास्तरावर, उपविभागीयस्तरावर, आणि तालुकास्तरावर बैठका घेण्यात आल्या. यासाठी जिल्ह्यातील नागरिक, सेवाभावी संस्था, पदाधिकारी समाजातील विविध घटकांचे सहकार्य मिळाले. गृहभेट देऊन जनजागृती केलेल्या कुटुंबाबाबतचा अहवाल विहित प्रपत्रात संकलीत करण्यात आला. माझे कुटुंब- माझी जबाबदारी या अभियानात ही नावीन्यपूर्ण मोहीम मैलाचा दगड ठरली. आजच्या या आरोग्यविषयक मोहिमेला जिल्ह्यात लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले.

00000